+91 2443 241914

महाविद्यालयातील विविध कार्यरत असलेले विभाग

 • 1.
 • ग्रंथालय

  महाविद्यालयात सुसज्ज व अद्यावत ग्रंथालय आहे. त्यामध्ये विविध अभ्यासक्रमाची पुस्तके, संदर्भ ग्रंथ, विविध मासिके, साहित्य ग्रंथ उपलब्ध आहेत. त्याच बरोबर सर्व सोईयुक्त वाचनकक्ष सुध्दा उपलब्ध आहे.

 • 2.
 • संगणक कक्ष

  महाविद्यालयात सर्व सोयीने परिपूर्ण संगणक कक्ष आहे त्यामध्ये इंटरनेटची सुविधा असून, विद्यार्थ्यांना नियमित संगणकाचा सराव व्हावा यासाठी महाविद्यालय कटिबध्द आहे.

 • 3.
 • विज्ञान प्रयोग शाळा

  महाविद्यालयात शास्त्र विषय असणा-या विद्यार्थ्यांकरिता अद्यावत अशी विज्ञान प्रयोगशाळा आहे त्यामध्ये सर्व प्रयोग साहित्य उपलब्ध असून विद्यार्थ्यांना प्रात्यक्षिके करण्याची संधी व वैयक्तिक लक्ष दिले जाते.

 • 4.
 • मानसशास्त्रीय प्रयोगशाळा

  बी.एड्. अभ्यासक्रमातील मानसशास्त्रीय प्रयोग करण्यासाठी सुसज्ज व आधुनिक अशी मानसशास्त्रीय प्रयोगशाळा असुन विद्यार्थ्यांना सदरील प्रयोग प्रत्यक्षात करून पाहण्याची संधी मानसशास्त्रीय प्रयोगशाळेत दिली जाते.

 • 5.
 • शालेय तंत्रविज्ञान प्रयोगशाळा

  अध्ययन-अध्यापन प्रक्रियेची परिणामकारकता वाढवण्यासाठी त्यामध्ये आधुनिक तंत्रविज्ञान विषयक साधन सामुग्रीचा वापर करणे अपरिहार्य ठरते उदा. उर्ध्वशीर्ष पेक्षपक, एल.सी.डी. प्रोजेक्टर, डिजीटल बोर्ड ई. ही सर्व साधने महाविद्यालयात उपलब्ध आहेत. व वारंवार विद्यार्थ्यांना ही सर्व साधने वापरण्यासाठी पाठपूरावा केला जातो.

 • 6.
 • विषयनिहाय कक्ष

  महाविद्यालयात विषयनिहाय विविध स्वतंत्र कक्ष असून, सर्व कक्षामध्ये विषय निहाय साधन सामुग्री उपलब्ध आहे. विद्यार्थ्यांच्या शंकानिरसनासाठी प्रध्यापक वृंद सदैव तयार असतात.